‘ओंकार’ हत्ती सध्या तोरसे परिसरात दाखल

बांदा : प्रतिनिधी

ओंकार हत्ती सध्या तोरसे – दुसगी येथील पेट्रोल पंप परिसरात आल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. गोवा पोलीस व गोवा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्याकडे फारशी यंत्रणा नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. हत्तीचे नेमके ठिकाण समजण्यात अडचणी येत आहेत. महामार्गा नजीक हत्ती असल्याने सध्या एका बाजूने वाहने सोडण्यात येत आहेत.