राजापूर (वार्ताहर): राजापूर पोलिस स्थानकातील माजी पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नती झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री. परबकर यांनी पोलीस दलात यापुर्वी मुंबई, उस्मानाबाद, नागपूर, पालघर, व रत्नागिरी जिल्हात पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. राजापूर पोलीस स्थानकात चार वर्षे त्यांनी पोलीस निरीक्षकपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळली होती. त्यानंतर त्यांची रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. तेथुन गतवर्षी त्यांची मुंबईत बदली झाली होती सध्या ते मुंबईत काम करत आहेत. त्यांची आता सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदी पदोन्नती झाली आहे.
कायमच जनमानसात वावरून पोलीस व जनतेशी थेट सुसंवाद साधत सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा पोलीस अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. राजापूर व रत्नागिरीत काम करताना त्यांनी आपल्या कार्यशैलीची आगळी वेगळी अशी छाप पाडली. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी काम करत असताना त्यांनी काही खून प्रकरणांचा यशस्वी उलगडा करत आरोपींना बेडया ठोकल्या होत्या. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













