मोती तलावात अज्ञात बुडाल्याची भीती

शनिवारी सायंकाळी उशिरा घडली घटना

सावंतवाडी । प्रतिनिधी :

मोती तलावाच्या काठावर बसलेली अज्ञात व्यक्ती तलवात कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता च्या सुमारास घडली . संबंधित तरुण हा स्लाइडिंग कामगार असल्याचे कळते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोधाशोध सुरू आहे.

संबंधित तरुणा आज सायंकाळच्या सुमारास तलावा काठी बसला मात्र तो अचानक तलावात पडला हा सर्व प्रकार तेथील नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली आणि पोलीस हवलदार मनीष शिंदे यांनी याची खात्री करून शोधाशोध करण्यास सुरुवात केली आहे मात्र

काळोख झाल्याने शोधमोहीमेला अडथळा येत आहे.घटनास्थळी त्याला वाचवण्यासाठी गर्दी झाली होती.तर.त्याचे नाव व ठिकाण समजू शकलेले नाही.

Sindhudurg