रत्नागिरी Big Breaking: नामवंत उद्योजकाच्या खेड मधील कारखान्यावर ईडीची धाड ?

खेड । प्रतिनिधी:

खेड तालुक्यातील एका नामवंत उद्योजकाच्या उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यावर आज सकाळी ईडीने अचानक धाड टाकल्याची मोठी घटना समोर आली आहे. याची मोठी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. आज सकाळी नेमके आठ वाजताच ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी कारखान्यातील कागदपत्रे, व्यवहार आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू केली असून संपूर्ण परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे असे म्हटले जात आहे.

धाड पडलेले हे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा राजकीय वावर सुद्धा मोठा आहे. त्यामुळे या धाडीने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा वावर परिसरात असल्याने या कारखान्यावर पडलेल्या धाडीची खेड परिसरात तसेच जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. धाड कोणत्या प्रकरणात करण्यात आली, नेमका आर्थिक गैरव्यवहार कोणता आहे, ही इडीची धाड असेल तर याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र या कारवाईनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून अनेक राजकीय चर्चांना अधिक पेव फुटले आहे.