सावंतवाडीतील विजय सापळे यांचं निधन

देहदान करून समाजापुढे आदर्श

सावंतवाडी : सावंतवाडी येथील सबनीसवाड्यातील रहिवासी आणि मूळचे वेंगुर्ला येथील रहिवासी विजय कमलाकांत सापळे (वय ८० वर्षे) यांचं गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झालं. गेल्या ४० वर्षांपासून ते व्यवसायाच्या निमित्ताने सावंतवाडीमध्ये वास्तव्यास होते. समाजाला एक नवा आदर्श घालून देत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह गोवा बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात देहदान केला.

विजय सापळे यांच्या पश्चात पत्नी, पुतण्या, सून, ४ विवाहित पुतण्या, नातवंडं असा मोठा परिवार आहे. ते मारुती, अशोक, सुहास, व प्रदीप पोकळे, आणि रेखा पोकळे यांचे भावोजी होते.
देग्डान करताना त्यांची पत्नी चित्रा, पुतणी डॉ. योजना मोरजकर-सापळे, राकेश सापळे (पुतण्या) आणि श्रीशा सापळे (सून) यांच्यासह प्रसाद, प्रणिल, सनी व सागर पोकळे, तसेच मावस बंधू बाळ बोर्डेकर आदी नातेवाईक उपस्थित होते.