गतिमान विकासातून किनारपट्टीचा कायापालट करणार : आमदार निलेश राणे

मागील दहा वर्षात काहीच झाले नाही आता शंभर पट निधी आणणार

कुडाळ मालवणचे नाव आले की विकासनिधी मंजूर झालाच पाहिजे असे काम करणार

आमदार निलेश राणे यांनी मालवण बंदर जेटी येथे नागरिकांशी साधला संवाद

अमित खोत | मालवण : राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मालवण देवबाग बंधाऱ्यांसाठी 158 कोटी निधी जाहीर केला. यासोबत अनेक विकास प्रकल्प आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर होत आहेत. किनापरपट्टीच्या सुरक्षेसाठी बंधारे उभारणीसाठी सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. मालवण कुडाळच्या जनतेने संधी दिली त्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. जनतेची सेवा करतं असताना कुडाळ मालवण मतदारसंघाचे नाव आले की विकासनिधी मंजूर झालाच पाहिजे असे काम करण्याचा प्रयत्न आहे. आता विकासाची गती थांबणार नाही. सर्वाधिक निधी आणून किनारपट्टीचा कायापालट करणार. मागील दहा वर्षात या मतदार संघात काहीच झाले नाही. मात्र आता शंभर पट निधी आणणार. जनतेला अपेक्षित असलेली सर्व विकासकामे पुर्ण करणार. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.

मालवणच्या ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त आमदार निलेश राणे यांनी व्यापारी बांधवांच्या मानाच्या श्रीफळचे तसेच सागराचे पूजन करतं श्रीफळ अर्पण केले. पूजन करण्याचा मान गेली काही वर्षे व्यापारी बांधव व सर्वांनी दिला. यावर्षी जनतेच्या आशीर्वादाने आमदार म्हणून पूजन करण्याचा मान मिळाला. मच्छिमार, व्यापारी, नागरिक यांची भरभराट होउदे. असेही साकडे यावेळी घालण्यात आले.

दरम्यान मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने नागरिकांसाठी सामोसा व जिलेबी वितरण करण्यात आली. त्या ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. तसेच बंदर जेटी येथे आयोजित भाजपा महिला नारळ लढवणे स्पर्धा, सतीश आचरेकर मित्रमंडळ खुली नारळ लढवणे स्पर्धा, सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित राज्यस्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा, मालवणी संस्कृती व वारसा मंडळ अध्यक्ष अरविंद मोंडकर आयोजित महिला नारळ लढवणे स्पर्धा या स्पर्धाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाला. लायन्स क्लब आयोजित कबड्डी स्पर्धेचा शुभरंभही आमदार निलेश राणे यांनी केला. सर्व कार्यक्रम दरम्यान आमदार निलेश राणे यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,बाबा मोंडकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर,
शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, आबा हडकर, महेश मांजरेकर, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, राजा गांवकर, शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा संघटक किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हा प्रमुख निषय पालेकर, तालुकाप्रमुख अभि लाड, युवासेना पदाधिकारी सोनाली पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, महिला तालुकाध्यक्ष मधुरा तुळसकर, अरुण तोडणकर, राजू बिडये, यांसह, व्यापारी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

नगरोत्थान निधी पाच वर्षात सर्वाधिक आणणार

मालवण कुडाळ मध्ये नगरोत्थान निधी हा आगामी काळात सर्वाधिक स्वरूपात आणणारच. यापूर्वी किरकोळ स्वरूपात आलेला निधी पुढील पाच वर्षात रेकॉर्डब्रेक स्वरूपात आणणार. असा ठाम निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त करताना महायुती सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होत असल्याचे सांगत आभार व्यक्त केले.