नारळ लढविणे स्पर्धेत मनोज मयेकर, चेतन पालव अजिंक्य !

▪️शिवसेना मसूरे विभाग आमदार चषक नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न

मसुरे | झुंजार पेडणेकर शिवसेना जि. प. मसुरे विभागाच्या वतीने मसुरे बाजारपेठ येथे आयोजित आमदार निलेश राणे चषक भव्य नारळ लढवणे स्पर्धेत खुल्या गटातून अलिबाग येथील मनोज मयेकर यांनी प्रथम तर मालवण येथील सतीश आचरेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर स्थानिक रास स्पर्धेत वडाचापाट येथील चेतन पालव यांनी प्रथम तर वेंगुर्ले येथील सर्वेश करंगुटकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत खुल्या गटात 10 स्पर्धक तर स्थानिक रास गटात 102 स्पर्धक सहभागी झाले होते. खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक 7 हजार रुपये व द्वितीय पारितोषिक 4 हजार रुपये व प्रत्येकी चषक तर स्थानिक रास स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 3 हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष विनायक बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नारळी पौर्णिमा या सणाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व सांगत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी अशा स्पर्धाचे यापुढेही भव्य असे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. शिवसेना जिल्हा परिषद मसुरे विभागाच्या वतीने यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण तालुकाध्यक्ष विनायक बाईत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प. स. उपसभापती छोटू ठाकूर,वेरली सरपंच धनंजय परब महान सरपंच अक्षय तावडे युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, माजी प. स. सदस्य महेश बागवे, माजी सरपंच सौ गायत्री ठाकूर,उद्योजक दया देसाई, माजी उपसरपंच राजेश गावकर, बाबू परब, अशोक बागवे, शिवाजी परब, निलेश बाईत, राहुल बागवे, अनंत भोगले, अनिल खोत, सचिन पाटकर, सचिन आंगणे, राहुल परब, निलेश खोत, तात्या हिंदळेकर, प्रथमेश पाटकर, संजय राणे, जयेश इंदप, पुरुषोत्तम शिंगरे, पांडुरंग ठाकूर, पंढरीनाथ मसुरकर, मनीष बागवे, सुजन मिठबावकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबू आंगणे आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.