वेंगुर्ले l प्रतिनिधी :राखी हे नाते फक्त भाऊ बहिणीपुरतेच मर्यादित न राहता, समाजातील रक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतिक आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्याला भेट देत तेथील पोलिसांना राख्या बांधल्या आणि समाजाच्या रक्षकांबरोबर रक्षाबंधन हा आगळा वेगळा उपक्रम साजरा केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, सरचिटणीस आकांक्षा परब, चिटणीस प्रार्थना हळदणकर, सदस्य मानसी परब, रसिका मठकर, ईशा मोंडकर, रिया वायंगणकर आदी महिला उपस्थित होत्या. कर्तव्यदक्ष पोलिस आणि जबाबदार नागरिक यांच्यातील नाते अधिक घट्ट करणा-या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.










