माणगाव:
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना माणगाव येथे अलीकडे ब्रिजजवळ एका मालवाहू अवजड वाहनाच्या धडकेने रस्त्यावरचा गर्डर पडला होता
त्यामुळे सुमारे बराच काळ वाहतूक खोळंबली होती.
त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
मुंबई गोवा महामार्गावरून अवजड वाहनांना जाता येऊ नये त्यासाठी लावण्यात आला होता गर्डर
अवजड वाहनांच्या धडकेनेच पडला
कोणीतरी याही परिस्थितीत अवजड वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याने हा अडथळा सदृश्य गर्डर पडला
हा गर्डर सदृश्य अडथळा महामार्गावर पडला आहे तो उचलण्यासाठी एक मोठा हायड्रा तत्काळ घटनास्थळाकडे रवाना करण्यात आला
वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न झाले
त्याला यश आल आहे आणि अडथळा सदृश्य गर्डर हा गॅस कटरने तोडण्यात आल्याने ही वाहतूक सुरळीत झाली आहे
त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास थांबली होती
वाहतुकीचे नियंत्रण करण्याकरता घटनास्थळी पोलीस प्रशासन आदी सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.