आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख पदी राजा गांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सोबत त्यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजा गावकर यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शिवसेना सरपंच संघटना तालुका प्रमुख शाम वाक्कर, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख अरुण तोडणकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.













