वैभववाडीतील गांगो मंदिरातील घंटा चोरीला

वैभववाडी प्रतिनिधी

अज्ञात चोरट्याने वैभववाडी येथील श्री. गांगो मंदिरातील घंटा लांबविल्या आहेत. तालुक्यात मंदिरातील घंटा चोरीचे सत्र सुरूच आहे.त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसात उपळे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात दोन वेळा घंटा चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर कुसूर येथील मंदिरात घंटा चोरीस गेल्या आहेत. शिवाय यापूर्वी अनेक मंदिरांतून दानपेट्या ही फोडण्यात आल्या आहेत. मात्र या चोऱ्यांचा सुगाव लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
सांगूळवाडी रस्त्यावर वैभववाडी शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गांगो मंदिरातील घंटावर चोरट्यानी चोरुन नेल्या आहेत. या मंदिरातून दोन घंटा व एक टोप चोरट्यानी लंपास केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. ग्रामस्थांनी या चोरीची पोलिसांना माहिती दिली मात्र उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता.