मालवण आदर्श शहर बनवणार : आमदार निलेश राणे

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर विकसित होणारे शहर आहे. याठिकाणी मोठया संख्येने पर्यटक दाखल होतात. या सर्वांचा विचार करता नागरिक आणि पर्यटक यांना अधिक सेवा सुविधा देण्यासाठी नगरोत्थान व अन्य योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. आताही 54 कोटी निधी मंजूर झाला आहे. विकासकामे व नागरी सुविधा या माध्यमातून मालवण शहर आदर्श शहर बनवणार! असा निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

मालवण शहरातील शिवसेना नवनियुक्त पदाधिकारी व उपस्थित नागरिक यांच्याशी आमदार निलेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून काम झाले पाहिजे. जनतेला समस्या निर्माण होता नये यासाठी, पर्यटकांना समास्या निर्माण होता नये. यासोबत कचरा, पार्किंग व अन्य ज्या समस्या आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.