स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांचा उषोषणाचा ईशारा
राजापूर l प्रतिनिधी : तालुक्यातील भू सरफरेवाडीकडे जाणारा रस्त्यावर गडगा घालून अडथळा निर्माण केला असल्यामुळे गेली वर्षभर ग्रामस्थ गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पूर्वापार रहदारीसाठी खुला असलेला रस्ता अडथळ्यामुळे ग्रामस्थासाठी अडचणीचा व धोकादायक झाला आहे. या बाबत तकारी करूनही दखल घेतली गेली नसल्याने येथील ग्रामस्थांनी अखेर १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात या रस्त्याने सरफरेवाडीतील गुरे वाड्याकडे जाण्याचा, शेती आवजाराची ने-आण करण्याचा, तसेच सरफरे समजाची आराध्य दैवत असलेल्या विठ्ठालादेवी मातेच्या स्थानाकडे जाण्याचा हा रस्ता आहे. सरफरे वाडीत रिक्षा आण्यापुरता देखील रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे वयस्कर अथवा आजारी व्यक्तीला अक्षरश उचलून एसटीच्या रस्त्यापर्यत न्यावे लागते. हा रस्ता कच्च्या स्वरुपात असून ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत आहे व त्याची ग्रामपंचायतीच्या अभिलेखात नमूना नंबर २३ ला नोद देखील करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर रस्त्याचे पक्या स्वरुपात बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी देखील प्राप्त झाला आहे. परंतु रस्त्यावरील अडथळा दूर न केल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.
वस्तूस्थितीचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून, तहसिलदार महसूल जिल्हाधिकारीकार्यालय रत्नागिरी व निवासी नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राजापूर यांच्या आदेशाकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष करून आदेशांची अवहेलना करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना प्रशासक ग्रामसेवक, ग्रामपंचायत भू यांचे विरुद्ध त्वरित कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, पंचायत समिती राजापूर येथून 10 जुलै 2025 या पत्रानुसार आमच्या विरुद्ध अन्यायकारक व एकतर्फी निर्णय घेण्यात आले आहे. आमचे म्हणणे विचारात घेण्यात आलेले नाही असे नमूद केले आहे.
यासंदर्भात तकारी देऊनही दखल घेतली गेली नाही. यामुळे दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत भू कार्यालयासमोर आम्ही उपोषण छेडण्या निर्णय घेतला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा व संबंधित विभागांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. आमच्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे नमूद केले आहे. या निवेदनावर अमित सरफरे व सरफरेवाडीतील २१ ग्रामस्थांया सहया आहेत.










