आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची मेजवानी
जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील तुळसुंदे (मावळतीवाडी) येथे श्री बालाजी भक्त मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त भव्य तिरुपती बालाजी भक्तीवारी उत्सवाचे आयोजन शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५ ते मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. धार्मिक विधी, भजने, प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचा संगम असलेला हा उत्सव पंचक्रोशीतील भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
उत्सवाचा कार्यक्रम तपशील शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. : तिरुपती बालाजी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, रात्री ९.०० वा. : स्थानिक प्रासादिक भजन मंडळांचे सुस्वर भजन कार्यक्रम श्री तुळसादेवी प्रासादिक भजन मंडळ, तुळसुंदे, श्री किंजळादेवी प्रासादिक भजन मंडळ, तुळसुंदे बालमित्र प्रासादिक भजन मंडळ, तुळसुंदे रविवार, १० ऑगस्ट २०२५ सकाळी १०.०० वा. : क्रिकेट स्पर्धा सकाळी ११.०० वा. : लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर
सायं. ७.०० व ८.०० वा. : सुस्वर भजन कार्यक्रम — श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ रात्री १०.३० वा. : बालाजी महिला भक्त मंडळ प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ – मुख्य आध्यात्मिक सोहळा सकाळी ५.३० वा. : श्री काडसिद्धेश्वर भक्त मंडळ तर्फे काकड आरती सकाळी ९.०० वा. : सुस्वर भजने व नामस्मरण दुपारी १२ ते २ वा. : महाप्रसाद दुपारी ३.०० वा. : सांप्रदायिक सुस्वर भजन सायं. ४.०० ते ५.०० वा. : प. पु. श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांचे मंगलमय आगमन, स्वागत यात्रा, दिंडी मिरवणूक व पाद्यपूजन सायं. ५.०० वा. : अध्यात्मिक सत्संग, प्रवचन व दर्शन सायं. ८.०० वा. : महाप्रसाद, नामस्मरण व भजन मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ – महापूजा, हळदीकुंकू व समारोप सकाळी ९.०० वा. : श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद दुपारी १२ ते २.३० वा. : महाप्रसाद सायं. ४.०० वा. : बालाजी महिला भक्त मंडळ आयोजित हळदीकुंकू समारंभ सायं. ७.०० वा. : श्री एल प्रासादिक भजन मंडळ, पूर्णगड यांचे सुस्वर भजन रात्री १०.०० वा. : विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार, आभारप्रदर्शन व बक्षीस वितरण रात्री ११.०० वा. : महिला डबलबारी (पारंपरिक) भजनांचा जंगी सामना हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ, पाटथर (बुवा सौ. प्राजक्ता परब-सावंत)श्री माऊली प्रासादिक महिला भजन मंडळ, नाडण वरची (बुवा कु. किर्ती पुजारे).
या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात धार्मिक विधींबरोबरच क्रिकेट स्पर्धा, मोफत नेत्र तपासणी शिबीर, महिला हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक महिला भजन स्पर्धा यांसारखे विविध उपक्रम आयोजित केले आहेत. पंचक्रोशीतील असंख्य भाविक, भजन मंडळे व सांस्कृतिक कलाकार या चार दिवसांच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
हा उत्सव श्री बालाजी भक्त मंडळ तुळसुंदे, श्री काडसिद्धेश्वर भक्त मंडळ, श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ तसेच ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्याने पार पडणार असून, सर्व भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












