जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर निधीतुन नवोदय विद्यालय पडवेला 300 फॅन व 10 इलेक्ट्रिक गिझर भेट

 

आमदार किरण सामंत यांच्या हस्ते विद्यालयाकडे सुपुर्द 

राजापूर l प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील पडवे येथे असलेल्या नवोदय विद्यालय पडवे या विद्यालयाला जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून पाठपुराव्यानंतर 300 फॅन आणि दहा इलेक्ट्रिक गिझर देण्यात आले. आमदार किरण सामंत यांच्या हस्ते नुकतेच या वस्तु विद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आले.

येथील विद्यार्थ्यांची गैरसोय ओळखून राज्याचे उदयोगमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या पाठपुराव्याने या कंपनीकडून विद्यालयासाठी या वस्तु उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने चालविले जाणारे हे जिल्हास्तरीय नवोदय विद्यालय हे पडवे येथे आहे. या ठिकाणी मेरिटमधील विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन उच्चस्तरावरती या तालुक्याचा आणि जिल्ह्याचे नाव भूषवत आहेत. येथील विद्यार्थ्यांना गरम पाणीची गैरसोय होत होती व फॅनचीही आवश्यकता होती. त्यांची ही गैरसोय ओळखून आमदार किरण सामंत यांनी जेएसडब्ल्यू यां कंपनीच्या माध्यमातून हे फॅन आणि गिझर देण्याचा शब्द दिला होता. याबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी झाल्यानंतर रत्नागिरीचे प्रांताअधिकारी जीवन देसाईने यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीकडून 300 फॅन आणि दहा इलेक्ट्रिक गिझर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे सुपुर्द करण्यात आले. या प्र संगी आमदार किरण सामंत यांनी नवोदय विद्यालयाचे कौतुक केले येथील विद्यार्थी घडवण्यासाठी येथील शिक्षकांचे मेहनत पाहता त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे असेही असेही नमुद केल. या नवोदय विद्यालयातून आयपीएस आयएएस अधिकारी घडावेत आणि लांजा राजापूर रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करावं ही प्रामाणिकपणाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदय विद्यालयाचे विविध समस्या बाबत ही चर्चा करण्यात आली असलेल्या समस्या लवकरात लवकर पूर्ण करू असा शब्दही आ. सामंत यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमाला जि. प,. चे माजी शिक्षण सभापती विलास चाळके, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, भाजपाचे रवींद्र नागरेकर, जिल्हा बँकेचे संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, जेएसडब्ल्यू फौंडेशनच्या संपदा धोपटकर ,प्राचार्य एम. बसवराज, नायब तहसीलदार विलास, निलेश सुर्वे ,निनाद अवसरे, बाबू अवसरे, जानवी गावकर, मनोज आडविलकर ,राजन कोंडेकर, नंदू मीरगुले,दिनेश पवार यांच्यासहित पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.