वेंगुर्ले : दाजी नाईक
आज श्रावणी सोमवार निमित्त गोवा येथील एका भक्ताकडून जाई च्या फुलांचा अंगरखा आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे.
नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी सर्वत्र प्रचिती असलेल्या श्री देव वेतोबाच्या चरणी अनेक भक्त आपापल्या परीने वेगवेगळी सेवा अर्पण करत असतात.आज श्रावण सोमवार निमित्त एका भक्ताकडून जाई च्या फुलांचा अंगरखा देवाला अर्पण केला आहे.
देवाच्या अंगावर भक्तीच्या हारात गुंफलेली ही जायांची पाकळी येणाऱ्या भाविकांना वेगळीच अनुभूती देऊन जात आहे.












