भारताचे गौरव गान स्पर्धा जल्लोषात संपन्न

भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले आणि हे वैभवशाली स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिले याचे भान प्रत्येक पिढीला आणि आजच्या शालेय विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे यानिमित्ताने नवनिर्माण हाय या शाळेने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या .स्पर्धेचे हे अकरावे वर्ष .
सदर स्पर्धा दोन गटात विभागण्यात आली होती प्राथमिक गट पहिली ते पाचवी आणि माध्यमिक गट सहावी ते ९ वी.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर श्री राजेंद्र यादव सर प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते .आपल्या मनोगतात त्यांनी देशभक्ती म्हणजे काय याची माहिती देताना शाळेने अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करावे असा संदेश दिला .
स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी आनंद पाटणकर सर आणि श्वेता जोगळेकर मॅडम उपस्थित होत्या
तर दुपारच्या सत्रात बक्षीस समारंभ संपन्न झाला .
या बक्षीस समारंभासाठी कोस्टगार्ड च्या पूनम थापा जुनगरे (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) उपस्थित होत्या.
आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मुलांना देशसेवा म्हणजे काय ? विविधतेतून एकता कशाप्रकारे दिसून येते , देशासोबत जोडल्या गेलेल्या भावना कशा असतात, हे व्यक्त करून मुलांशी संवाद साधला. स्पर्धेमध्ये नऊ शाळांचा सहभाग होता
प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय पारितोषिक जगद्गुरु नरेंद्राचार्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तृतीय पारितोषिक नवनिर्माण हाय आणि उत्तेजनार्थ माने इंटरनॅशनल स्कूल ला मिळाले. तसेच माध्यमिक गटात माने इंटरनॅशनल स्कूल प्रथम पारितोषिक फाटक हायस्कूल द्वितीय पारितोषिक शिर्के गुरुकुल तृतीय क्रमांक आणि नवनिर्माण उत्तेजणार्थ क्रमांक मिळाला .
शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात आली .
तसेच संस्थेचे चेअरमन अभिजीत hegshetye यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते
.स्पर्धेचे सूत्रसंचालन खुशी राऊत व पुरवा घाडी यांच्या सुमधुर आवाजाने करण्यात आले तर आभार प्रदर्शन लुबना दवे आणि सोनाली मसुरकर यांनी केले