कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात तिरंगा बाईक रॅली

कणकवली : नगरपंचायतच्या माध्यमातून हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत बुधवारी शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी नगरपंचायत कार्यालयाकडून तिरंगा बाईक रॅलीची सुरवात करून पटकीदेवी मंदिर, बाजारपेठ मार्गे कणकवली रेल्वे स्टेशन व तेथून पुन्हा कणकवली नगरपंचायत अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. तसेच रॅली च्या माध्यमातून शहरात वातावरण निर्मिती व जनजागृती करण्यात आली. या रॅलीत सर्व नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.