गोपालकृष्णाला ५६ भोग अर्पण करून अधिक मास साजरा
नाशिक – अधिक महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त येवला शहरातील मेनरोड परिसरातील श्री महालक्ष्मी माता मंदिरात भक्तिमय वातावरणात गोपालकृष्णासमोर ५६ भोगांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला. या विशेष धार्मिक सोहळ्यामुळे मंदिर परिसर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मंदिर आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि धार्मिक वातावरणाने सजले होते. महानैवेद्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित भक्तांनी श्रीकृष्ण नामस्मरण, भजन आणि आरतीमध्ये सहभाग घेतला.












