वंदे मातरम, भारत माता की जय, च्या घोषणांनी परिसर झाला तिरंगामय
शाळकरी मुलांचीही होती उपस्थिती
कणकवली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला कणकवली शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. वंदे …. मातरम, भारत माता की … जय, अशा घोषणांनी शहरातील परिसर तिरंगामय झाला होता. मोठ्या उत्सुकतेने नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक या दरम्याना ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संदेश सावंत, युवमोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, समीर प्रभुगावकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, मेघा गांगण, प्रज्ञा ढवण, संजना सदडेकर, सुप्रिया मेस्त्री, प्रज्वल वर्दम, संजय कामतेकर, सागर राणे, निसार शेख, पप्पू पुजारे, हळवल माजी सरपंच संतोष गुरव, कळसुली सरपंच सचिन पारधीये, शिवा राणे, समीर सावंत, स्वप्नील चिंदरकर, संदीप सावंत, नामदेव जाधव, प्रभाकर राणे, अजित तांबे, सुभाष मालांडकर यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व अन्य नागरिक उपस्थित होते.














