स्वातंत्र्यदिनी वालावल ग्रामपंचायतीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कुडाळ । प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वालावल ग्रामपंचायतीच्यावतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला वालावल गावचे सरपंच श्री राजेश प्रभू, उपसरपंच सौ पूर्वा आडेकर, आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यामध्ये श्री . राजू बंगे, श्री मनोज पाटकर, सौ समीक्षा गोवेकर, सौ साक्षी कवठणकर, सौ प्राची हळदणकर, सौ वालावलकर, आणि सौ सुभद्रा कुंडेकर यांचा समावेश होता.

यावेळी वालावल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री कोठावळे सर आणि शिक्षक श्री संतोष गोसावी सर व श्री भाग्यविधाता वारंग सर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. माजी सरपंच श्री निलेश साळसकर, वालावल देवस्थान कमिटीचे सदस्य श्री गुरु देसाई, वालावल पोलिस पाटील श्री समीर वालावलकर, श्री अक्षय राऊळ आणि प्रसिद्ध मालवणी समालोचक श्री बादल चौधरी हेही या वेळी उपस्थित होते.

याशिवाय, सौ उमा प्रभू, सौ मानसी चव्हाण, प्राथमिक शाळा १ च्या मुख्याध्यापिका सौ शृंगारे मॅडम आणि शिक्षक श्री वारंग सर यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी श्री समीर चौधरी, श्री कुलदीप खानोलकर, श्री पोयरेकर आणि श्रीमती सावे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलाचे उपस्थितांनी कौतुक केले. या वेळी मोठ्या संख्येने वालावल ग्रामस्थही उपस्थित होते.