राजापुरात दहीहंडी उत्सव पारंपारिक पध्दतीने जल्लोषात साजरा

राजापूर (वार्ताहर): शहर आणि तालुका परिसरात शनिवारी पारंपारिक पध्दतीने दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. गोविंदा पथकांनी ढोलताशांच्या गजरात गोविंदा.. गोपाळाच्या जयघोषात दहीहंडया फोडत उत्सवाचा आनंद लुटला.

शहरात विविध ठिकाणी पारंपारिक दहीहंडया बांधण्यात आल्या होत्या. त्या शहरातील रूमडेवाडी, चव्हाणवाडी, दिवटेवाडी तसेच गुरववाडी, ओगलेवाडी, आंबेवाडी, वरचीपेठ, खडपेवाडी, कोंढेतड धोपटेवाडी येथील गोविंदा पथकांनी फोडत उत्सवाचा आनंद साजरा केला.

शहरातील दहीहंडया दत्तप्रासादीक गोविंदा पथक रूमडेवाडी, निनादेवी चव्हाणवाडी, भगवा रक्षक गुरववाडी, हनुमान प्रसन्न खडपेवाडी, पवार मित्रमंडळ दिवटेवाडी, धुतपापेश्वर मंडळ साखळकरवाडी, आंबेवाडी आदी पथकांनी दहीहंडया फोडल्या. कोंडेतड धोपटेवाडी येथे श्री कृष्ण जन्मोत्सव आणि पारंपारिक दही हंडी (गोपाळकाला) सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.