साळशी येथील इनामदार श्री पावणाई देवी मंदिरात पारंपारिक दहीहंडी उत्सव

शिरगाव (प्रतिनिधी )

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौऱ्याऐंशी खेड्याचे अधिपती म्हणून ओळखले जाणारे देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री पावणाई देवी मंदिरात गोविंदा-गोपाळाच्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात, बाल गोपाळांच्या उपस्थितीत आणि रीती-रिवाजांनुसार पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.