कै. सिद्धी मराठे स्मृती पारितोषिक वितरण समारंभ
शिरगाव (प्रतिनिधी) –देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर, साळशी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण मुख्याध्यापक माणिक वंजारे यांच्या हस्ते, तर १४ ऑगस्ट रोजी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या केतकी रवींद्र साळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी मुख्य सोहळ्यातील ध्वजारोहण स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान भोगले यांच्या हस्ते झाले.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने कै. सिद्धी संजय मराठे स्मृती पारितोषिक इयत्ता आठवी ते दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. या प्रशालेतील सहाय्यक शिक्षक संजय मराठे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून दरवर्षी देण्यात येणारे हे पारितोषिक शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील केतकी रवींद्र साळसकर (दहावी), हिमानी चंद्रकांत घाडी (नववी) आणि धीरज विजय घाडी (आठवी) या विद्यार्थ्यांना, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान भोगले, सदस्य विजय घाडी, संस्था पदाधिकारी संतोष साळसकर, ग्रामपंचायत सदस्या आदिती रावले, मीनाक्षी लाड, जगदीश देवणे, सीताबाई मिराशी, राजेंद्र साटम, या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सर्व शिक्षकवर्ग, सरमळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी, देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर व मदतनीस संध्या नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.











