रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील खानू-सुतारवाडी येथे शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण करत तिचे डोके दगडी भिंतीवर आपटून दुखापत केली.
दीपक कृष्णा सुतार (रा. खानू सुतारवाडी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नी दिव्या दीपक सुतार (39) हिने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, तिचा पती दिपकला दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी दुपारी ती झोपलेली असताना तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर तिला हातांनी मारहाण करत तिच डोक दगडी भिंतीवर आपटून दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.










