रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा. करण्यात आली.
फहाद मुश्ताक पाटणकर (32,रा. ओर्चीड अपार्टमेंट शिवाजीनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस हवालदार विनोद कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री संशयित हा रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडाखाली बसून गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायदा 8 (k) 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









