निवती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांची सामाजिक बांधिलकी

वेंगुर्ले : प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी म्हणून एस. एल. देसाई विद्यालय, पाट या विद्यालयातील इयत्ता ५ वी मधील दोन विद्यार्थी यांचा या वर्षीचा सर्व शैक्षणिक खर्च निवती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी आपण देण्याचे जाहीर केले.
विद्यालयात घेतलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष जनजागृती मोहीम अंतर्गत कार्यक्रमामद्ये या दोन विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, ड्रेस, बूट, वह्या, पेन इत्यादी साहित्य श्री. गायकवाड यांच्या मार्फत देण्यात आले. ही मदत नाही तर आपली समाजाप्रती आणि देशाप्रती जबाबदारी समजतो असे सांगून पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड यांनी यापुढेही जितके आपणास शक्य आहे तितके आपण करू असे जाहीर केले. या कार्यक्रमाला अन्य मान्यवरही उपस्थित होते.