Breaking: जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोका पातळी

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नद्या इशारा पातळीच्या वर

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला मान्सूनचा चांगलाच तडाखा बसला आहे. रत्नागिरी पाटबंधारे मंडळाने आज सकाळी ९ वाजता दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नद्यांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:
* जगबुडी नदी: खेड – भरणे पुल येथे या नदीची इशारा पातळी ४.०० मीटर, तर धोका पातळी ७.०० मीटर आहे. सद्यस्थितीत नदीची पाणीपातळी ७.२० मीटर असून ती धोका पातळीच्या वर आहे.
* शास्त्री नदी: संगमेश्वर – शास्त्री पुलाजवळ या नदीची इशारा पातळी ६.२० मीटर आहे. नदीची पाणीपातळी ६.४० मीटर असून, ती इशारा पातळीच्या वर वाहत आहे.
* कोदवली नदी: राजापूर – राजापूर पुल येथे या नदीची इशारा पातळी ४.१० मीटर आहे. सद्यस्थितीत नदीची पाणीपातळी ५.२० मीटर असून, ती इशारा पातळीच्या वर वाहत आहे.
इतर नद्यांची पाणीपातळी सध्या नियंत्रणात असली तरी, पावसाचा जोर कायम राहिल्यास ती वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जगबुडी नदीच्या पाण्याची सध्याची पातळी 

Jagbudi River @ Bharane naka Bridge Tal.Kd

Time: 09.00 @AM

Water Lvl : *07.20 M* .⬆️

Alert Lvl. : 5.00 M.

Danger Lvl : 7.00 M.