खेड (प्रतिनिधी) वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात (सीबीएसई) इ. १ली ते१२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगांवकर यांनी कर्मचाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉ. एस. एस. अली यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.












