स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
वेंगुर्ले : दाजी नाईक
पोलीस असल्याचे सांगून वृद्ध इसमांना लुटणाऱ्या टोळीतील आणखी एका इराणी आरोपीतास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्याकडून सांगली येथून अटक करण्यात आली आहे. उनमत युसुफ इराणी, वय ३२ वर्ष असे त्याचे नाव आहे.
४ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल होते. हे दोन्ही गुन्हे पोलीस असल्याचे बतावणी करून अज्ञात चोरटे पळून गेल्यामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान या गुन्ह्यामध्ये यापूर्वी अबू तालीम मुसा इराणी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाने सांगली येथून अटक केलेली होती. दरम्यान आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी याच गुन्ह्यामध्ये आणखी एक आरोपी सांगली येथील उनमत युसुफ इराणी, वय ३२ वर्ष याला सांगली रेल्वे स्टेशन जवळ, इराणी वस्ती येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी सांगली रेल्वेस्टेशन जवळ शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता वेंगुर्ला पोलीस स्टेशन यांचे ताब्यात सायंकाळी देण्यात आलेले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल- अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस व पोलीस कॉन्स्टेबल- अमर कांडर यांनी ही कारवाई केली आहे.










