राजापुरात अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी कोदवली साईनगर येथील लॉज मालकाविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी चार जणांविरोधातही गुन्हा दाखल

राजापूर (प्रतिनिधी): राजापुरात एका अल्पवयीन युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार केले प्रकरणी राजापूर पोलीसांनी शहरानजीनच्या कोदवली साईनगर पुर्नवसन वसाहतीतील मँगो लॉजचा मालक महंमद मुबारक ठाकूर रा. मधीलवाडा राजापूर याच्या विरोधातही कलम १७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मिडिया इंस्टग्राम अकाऊंटवर झालेल्या ओळख व मैत्रितुन एका अल्पवयीन युवतीला शहरानजीकच्या कोंदवली साईनगर येथील मँगो लॉजवर नेऊन तीच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ करून अन्यत्र व्हायरल करत तीची बदनामी केल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी एका अल्पवयीन युवकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. १९ ऑगस्ट रोजी २०२६ सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली साईनगर येथील एका लॉजवर हा प्रकार घडला होता. ७ सप्टेंबर रोजी पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याबाबत पिडीतेच्या तक्रारीवरून याप्रकरणी तातडीने राजापूर पोलीसांनी सखोल तपास सुरू केला होता. अशा प्रकारे काढण्यात आलेला व्हिडिओ अन्य कुणाकडे व्हायरल करण्यात आला, पुढे तो कोणी कोणी व्हायरल केला यादृष्टीने सर्व तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास केला होता.

तर सदरचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आणखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याकडे आलेला तो व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी प्रणय सुधाकर जोशी (१८) रा. सागवे नाखरेवाडी, आर्यन नरेश धुळप (१९) रा. सागवे चिंचाडी, सिध्देश सत्यवान कायंदेकर (२०) रा. सागवे कात्रादेवीवाडी व यश गणपत आंबेरकर (२१) रा. सागवे कात्रादेवी वाडी या चार जणांविरोधात कलम 63 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तर या प्रकरणात पोलीसांनी शहरानजीनच्या कोदवली साईनगर पुर्नवसन वसाहतीतील मँगो लॉजचा मालक महंमद मुबारक ठाकूर रा. मधीलवाडा राजापूर याच्या विरोधातही पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणी या सर्व संशयीत आरोपींना नोटीस बजावण्यात आलेली असून या प्रकरणी लवकरच खटला राजापूर न्यायालयात पाठविण्यात येणार आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव हे तपास करत असून या प्रकरणी पोलीसांनी सखोल चौकशी करत अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल करणारे आरोपी व लॉज मालकाविरोधात कारवाई केल्याने या कारवाईचे स्वागत होत आहे.