रत्नागिरी: गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील संगणकशास्त्र विभागाने १७ ऑगस्ट २०२५ रोजी “क्लासरूम ते क्लाउड: GitHub द्वारे प्रोजेक्ट व्यवस्थापन” या विषयावर एक माहितीपूर्ण सत्राचे आयोजन केले होते. या सत्रासाठी श्री. कौशिक मुसळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सत्रात, GitHub च्या मदतीने प्रकल्प कसे व्यवस्थापित करावे, कोडिंगमधील सहकार्याची भूमिका आणि क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. श्री. मुसळे यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक प्रकल्प अधिक प्रभावी कसे बनवता येतील याबद्दल मार्गदर्शन केले.
या सत्रात एकूण ८७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. मुसळे यांनी समर्पक उत्तरे देऊन संवादात्मक वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, सीएस/आयटी समन्वयक सौ. अनुजा घारपुरे, तसेच संगणकशास्त्र आणि डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले आणि विशेष सहकार्य दिले. यासोबतच इतर सर्व अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्टिकोन आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होते, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.












