डीजीके कॉलेजमध्ये लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी परीक्षा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये (डीजीके कॉलेज) इतिहास विभाग व आय.क्यु.ए.सी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना प्रश्नाच्या मार्फत इतिहास कळवा या उद्देशाने एक नवीन उपक्रम करण्यात आला. इतिहास विषयाचे द्वितीय, तृतीय या वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. लोकमान्य टिळक कार्यक्रमाचा प्रारंभ टिळकांच्या प्रतिमापूजनाने झाली. इतिहास विभागप्रमुख प्रा. मंदार बेटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोकमान्य टिळकांनी युवकांना शिक्षणाबद्दल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुरा पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमानिमित्त सूत्रसंचालन आर्या पावरी हिने केले.