डीजीके वरिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सरावाचा प्रारंभ

डीजीके वरिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सरावाचा प्रारंभ

रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा स्पर्धांच्या सरावाचा प्रारंभ करण्यात आला. भारत शिक्षण मंडळ संस्थेचे उपकार्याध्यक्ष चंद्रकांत घवाळी व चंद्रशेखर केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा सराव करताना घ्यावयाची काळजी व क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवण्यासाठी लागणारी मेहनत व कौशल्ये याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्र. प्रा. मधुरा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. क्रीडा सराव उद्घाटनप्रसंगी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. टी.वाय.बीकॉम (मुलगे) संघ विजेता झाला. आणि टी.वाय.बी. ए. (मुलगे) संघाने उपविजेतेपद मिळवले. मुलींमध्ये बी.एस्सी संघ विजेता झाला व एस. वाय. बीकॉम संघ उपविजेता ठरला. प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्रचार्या वसुंधरा जाधव, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. मंदार बेटकर व विज्ञान शाखा प्रमुख प्रा. वैभव घाणेकर उपस्थित होते. प्रा. हर्षदा लिंगायत यांनी आभार मानले.