गुहागर तालुका भाजपा तर्फे पालशेत येथे भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

 

आबलोली l वार्ताहर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी , गुहागर विधानसभा आयोजित भव्य दिव्य संगीत भजन स्पर्धा दिनांक ८ जुलै २०२३ रोजी गुहागर तालुक्यातील पालशेत येथील श्री. दत्त मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आल्या असून गुहागर तालुक्याचे

माजी आमदार डॉ.विनयजी नातू यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या संगीत भजन स्पर्धेतील प्रथम विजेत्या भजन मंडळाला रोख रक्कम २५हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्या भजन मंडळाला रोख रक्कम १५हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्या भजन मंडळास रोख रक्कम १०हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी भजन मंडळाला सहभाग सन्मानचिन्ह व प्रोत्साहन पर रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गायक, पखवाज, चकवा,तबला, कोरस यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित करण्यासाठी दिनांक ३ जुलै २०२३ पर्यंत खाली दिलेल्या नंबर वरती तातडीने संपर्क करावा. स्पर्धेचे नियम व अटी तसेच अधिक माहितीसाठी सचिन मुकुंद ओक मो. ९४२११८७४९७, संगम मोरे ७८७५८३०९१४, ८६००८७४३४४ यांच्या कडे संपर्क साधावा.या संगीत भजन स्पर्धेत जास्तीत जास्त संगीत भजनी मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, गुहागर विधानसभा चिपळूण अध्यक्ष अजित थरवळ यांनी प्रशिध्दी पत्रकाव्दारे केले आहे