आ. निलेश राणेंचा डोक्यावरील आशीर्वाद कायम राहावा हीच इच्छा : संजू परब 

मी जो काही आहे तो निलेश राणे यांच्यामुळेच

आ. केसरकरांसोबत काम करताना वेगळी उमेद 

सावंतवाडी । प्रतिनिधी : मी जो काही आहे तो निलेश राणे यांच्यामुळेच आहे. मला आमदारकी मिळो वा न मिळो, पण निलेश राणे यांचा माझ्या डोक्यावरचा आशीर्वाद कायम राहावा हीच माझी इच्छा आहे. जिल्हा प्रमुख म्हणून आ. दीपक केसरकर यांच्या सोबत काम करताना वेगळीच उमेद मिळते. या दोन्ही नेत्यांनी मला जीवनात पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिले हे आशीर्वाद कायम राहावेत हीच इच्छा आहे, अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री दीपक केसरकर आणि निलेश राणे यांचे त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, गेली १६ वर्षे निलेश राणे माझ्या वाढदिवसासाठी नेहमी उपस्थित राहिले. मुंबईत किंवा इतर कुठेही असले, तरी सर्व कामे बाजूला ठेवून ते माझ्या वाढदिवसाला येतात. त्यांचा हा पाठिंबा मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा त्यांनी मला धीर दिला. ‘तू काळजी करू नकोस, मी आहे,’ असे त्यांचे दोन शब्दही मला खूप ऊर्जा देतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहाचू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

*आ. केसरकर यांचा पाठिंबा आणि कामाची ऊर्जा*

आ. दीपक केसरकर मला नेहमी सांभाळून घेतात आणि काम करण्याची उमेद देतात. त्यांनी कालच सांगितले की प्रत्येक निर्णयात ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. जर केसरकर माझ्या पाठीशी असेच राहिले, तर मला खात्री आहे की मला माझ्या कार्यात कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.

संजू परब यांनी आपल्या भाषणात वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी माझ्यावर जे प्रेम ठेवले आहे, ते असेच कायम ठेवा. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर तुम्ही मला निश्चितपणे माफ कराल, अशी आशा आहे असे सांगत आभार व्यक्त केला.