आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली नियुक्ती ; आमदार निलेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या कुडाळ मालवण मतदार संघ सोशल मीडिया प्रमुख पदी किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्ती जाहीर केली.
किसन मांजरेकर यांनी यापूर्वी शिवसेना जिल्हा सचिव म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली. तसेच वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या कामाची दखल घेऊन शिवसेना शिक्षकेतर संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदाची जबाबदारी त्याच्यावर याच महिन्यात सोपावली. आता किसन मांजरेकर यांची कुडाळ मालवण मतदार संघ सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांनी किसन मांजरेकर यांचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर,
मच्छिमार संघटना मालवण तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, शाखा प्रमुख विलास मुणगेकर, वायरी विभाग प्रमुख मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.












