शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असे संघटनात्मक काम करू
महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत,जनतेची महायुती सरकारच्या माध्यमातून कामे मार्गी लावली जातील
कणकवली;
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील. याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. नारायण राणे साहेब घेतील. परंतु शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेली संघटनात्मक बांधणी जिल्ह्यात केली जात आहे. त्यादृष्टीने कणकवली विधानसभा क्षेत्रातील सहा नुतन पदाधिका-यांच्या नियुक्त्या कऱण्यात आल्या आहेत. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही हल्लीच महायुतीचे नारळी पौर्णिमेला नारळ फोडून कार्यक्रम साजरे केले.असे शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी सांगितले. आमचे टार्गेट उबाठा सेना आहे. अकार्यक्षम व उमेदवाराला पन्नास हजार मतं कशी पडली.त्या दृष्टीने या मतदारसंघात आणि जिल्ह्यातही आमचे काम चालू आहे.असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे , महिला आघाडी प्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख दादा साईल, फोंडाघाट सरपंच संजना आंग्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नुतन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देवून पुढील वाटचालीस आ. निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
महायुतीतील चर्चांबाबत काहीही शंका करण्याची गरज नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघात कुवत नसलेल्या उबाठा उमेदवाराला 50 हजार मते मिळाली आहेत,ती मते का मिळाली ? त्यामुळे ती 50 हजार मतांवर काम करुन शिवसेना संघटना उभी केली जाईल. जनतेची महायुती सरकारच्या माध्यमातून कामे मार्गी लावली जातील. समाजसेवा आणि समाजकारण करताना जिल्हापरिषद आणि पंचायत समिती यावर काम केलं जाईल. मित्र पक्षाला कोणताही त्रास होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल. संघटना जोमाने उभी करण्यासाठी या पदाधिका-यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे , असे आ. निलेश राणे यांनी सांगितले.











