​श्रावणी गुरुवार निमित्त भटवाडीतील दत्त मंदिरात घुमणार ‘संतवाणी’चा सूर

​सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी भटवाडी येथील श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक विधी आणि ‘संतवाणी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, भटवाडी-सावंतवाडी यांनी केले आहे.

या निमित्त ​सकाळी मंदिरामध्ये धार्मिक विधी, अभिषेक, लघुरुद्र आणि महापूजा उत्साहात पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता आरती होईल. तर रात्री ८ वाजता रघुकुल स्वरविहार सावंतवाडी प्रस्तुत “संतवाणी” या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

​या कार्यक्रमाचे सादरीकरण ईश्वरी तेजम उर्फ नुतन परब आणि त्यांचे शिष्यवर्ग करणार आहेत. यात ते अभंग आणि भजनांनी वातावरण भक्तीमय करतील. त्यांना तबल्यावर निरज भोसले, संवादिनीवर कु. मंगेश मेखी आणि पखवाजवर विशाल कोंडुरकर हे साथसंगत करतील. त्यांच्या उत्कृष्ट वादनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढेल.​ त्यामुळे त्या कार्यक्रमाला भाविकांनी तसेच संगीत प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.