विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : विजयदुर्ग येथील ऐतिहासिक श्रीदेव रामेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारी रामेश्वर -डोंगरेवाडी येथील प्रसिद्ध नवतरुण मित्रमंडळाच्या ढोल पथकाने सांगता करण्यात आली. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथील रामेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, रामेश्वर प्रसादिक भजन मंडळ, गिर्ये- पुजारेवाडी तसेच बुवा स्नेहल वारिक, बुवा संतोष पुजारे, जितेंद्र पुजारी, योगेश टुकरुल, तुकाराम बावकर रामेश्वरवाडी, कोलवाडी येथील अजित पुजारे याचबरोबर पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळानी आपली धार्मिक सेवा रामेश्वर चरणी अर्पण केली. श्रीदेव रामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन खडपे, जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर तसेच दोन्ही समितीचे पदाधिकारी, पुजारे मंडळी, बारापाचाचे मानकरी यांनी श्रावण महिन्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली होती.













