जिजाऊ संस्थेच्या वतीने विजयदुर्ग येथील मुलांना वह्या वाटप

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने विजयदुर्ग प्राथमिक मराठी आणि उर्दू शाळेमध्ये वह्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. बांधकाम सभापती संजय बोंबडी, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, माजी पं, स. सदस्या शुभा कदम, पडेल भाजपा मंडल सचिव प्रदीप साखरकर, विजयदुर्ग बूथ अध्यक्ष महेश चव्हाण, ग्रेसीस फर्नांडिस, दशरथ तळेकर, विपुल आंबेरकर, श्री. दुदवडकर आदी उपस्थित होते. या संस्थेच्या वतीने आजपर्यंत वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा, करियर विकास सेवा, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आदी उपक्रम राबविले जातात.