चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील साखर गाव या ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी साखरगाव ग्रामपंचायतचे सदस्य तथा साखरगाव ग्रामसमितीचे सदस्य आणि साखर, जांभूळवाडी निमेवाले घराण्याचे सुपुत्र राजेंद्र हरिचंद्र उतेकर यांची दि. २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत साखरगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र उतेकर हे गावच्या विविध समस्यांचे निवारण करणेसाठी तसेच सामाजिक व धार्मिक कार्यांत नेहमी हिरिरीने सहभाग घेवून ते नि:स्वार्थीपणे काम करत असतात. आशा या युवा नेतृत्वास साखरगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र उतेकर यांचीच निवड करावी, असा ठराव सर्वांनीच ग्रामसभेत घेऊन त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याबद्दल साखरगाव ग्राम समितीतर्फे तसेच साखरगाव येथील ग्रामस्थ बंधु भगिनींसह मुंबई, पुणे येथील तमाम ग्रामस्थ व मित्र परिवाराने त्यांचे भरभरून अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.











