हिंदू धर्म टिकवण्यासाठी हिंदू एकसंघतेची वज्रमुठ करा- जगतगुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्य

राजापुरात धर्मसभेत बोलताना दक्षिण पीठ नाणीजधामचे जगतगुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्य याप्रसंगी आ. सग्राम जगतात, सागर बेग
सुर्यमंदिराच्या रक्षणासाठी दक्षिण धर्मपीठाची शक्ती तुमच्या पाठीशी
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी हिंदु धर्माची पताका जगात फडकावली

राजापूर (वार्ताहर): माझा धर्म टिकला पाहिजे हे माझ्यासहित प्रत्येक हिंदूचे स्वप्न असले पाहिजे. धर्मासाठी कोणतीही तडजोड नाही. डरेंगे तो मरेंगे हे वेळीच लक्षात घ्या आणि हिंदू म्हणून संघटीत होऊन सुर्यमंदिरच नाही तर भविष्यात हिंदू धर्म टिकवण्यासाठी एकसंघतेची वज्रमुठ तयार करून सुर्यमंदिरावर ताबा मिळवा. यासाठी रामानंदाचार्य, नरेंद्राचार्य दक्षिण धर्मपीठाची सगळी शक्ती तुमच्या पाठीशी राहिल अशी ग्वाही दक्षिण पीठ नाणीजधामचे जगतगुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्य यानी राजापूर येथे हिंदु धर्मसभेत तमाम हिंदू बांधवांना दिली.

हिंदुनी एकजुट दाखवत मतदान केले आणि २०१४ मध्ये देशात परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतरत असतात पंतप्रधान मोदींच्या रूपात भगवंतांनी हिंदु धर्माची पताका जगभरात फडकावली. हिंदु धर्मच विश्व बंधुत्व आणू शकतो हे मोदींनी आपल्या कार्यकतूत्वातून दाखवून दिले. हिंदू धर्माची संस्कृती जगात पोहचविली असेही त्यांनी नमुद केले.

राजापुरात शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने राजापुरातील सुर्यमंदिराच्या रक्षणासाठी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या धर्मसभेला संबोधित करताना जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, हिंदू संघटनेचे सागर भैय्या बेग आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी आपल्या ओघवत्या मार्गदर्शनात हिंदुधर्माभिमान जागविला. ते म्हणाले हिंदु बहुसंख्य असलेल्या आपल्या देशात आपल्या श्रध्दास्थांनासाठी कटोरा घेवून न्याय मागावा लागतो ही हिंदुसाठी लांच्छनास्पद गोष्ट आहे. हिंदु बहुसंख्य असूनही आपण संघटीत नाही, जाती पाती, पंथ, पक्ष यामध्ये विभागले गेले आहोत. त्यामुळे एक दिवस हिंदु अडचणीत येतील आणि जर आपण या विरोधात संघटीत झालो नाही तर तो दिवस दुर नाही. त्यामुळे जागे व्हा जागृत व्हा असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर मुस्लीमांनी पाकिस्नाची मागणी केली. फाळणीमुळे दोन देश धर्माच्या आधारावर वाटले गेले तरीही काहींना हिदू द्वेशाचा किडा आहे. हिंदुनी कधीही कोणत्याही मशिदीवर, दर्गावर अतिक्रमण केल्याचे उदाहरण नाही मात्र काही धर्मांध मुसलमान कायदयाचे संरक्षण घेवून खुले आम मदरशे उभारत आहेत. मंदिरावर अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे आता डोळे उघडा. घाबरला तर एक दिवस तुमचं अस्तित्वच कोणी मान्य करणार नाही त्यामुळे संघटीत व्हा असे आवाहन त्यांनी केले.

उपस्थित हिंदू बांधव

राजापूरातील सुर्यमंदीर हे हिंदुचेच आहे. त्यावर असलेले शंखाचे चित्र भगवान विष्णूचे प्रतिक आहे. त्यासाठी वेगळा आणखी काय पुरावा हवा असा सवाल उपस्थित करत हिंदु धर्माला झुकविण्यासाठी काही गोष्टी जाणीवपुर्वक केल्या जातात. त्यामुळे पुराव्याने लढलो तर हे आपलं सुर्यमंदिर कधीच मिळणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपले उत्सव सुरू करा आपला अधिकार दाखवा असे आवाहन त्यांनी केले.

हिंदू व्होट बॅकेचा धाक निर्माण करा

राजकीय पक्षांनी कायमच हिंदुना जातीपातीच्या चक्रात अडकवून ठेवले आणि आपला स्वार्थ साधला, त्यामुळे यापुढे हिंदु म्हणून एकसंघ होणे काळाची गरज असून हिंदुचे रक्षण करेल त्याचाच पाठिशी राहण्याचा निर्धार करा. स्वातंत्र्यानंतर काही राज्यकर्त्यांनी आपल्या राजकीय फायदयासाठी मुसलमानांचे फाजील लाड करणे सुरू केले. त्यापैकीच एक वक्फ बोर्डचा कायदा असून त्या आधारे कायद्याने अल्पसंख्याकांना अधिकार दिले. त्यामुळे हा कायदा बहुसंख्य असलेल्या हिंदुच्या हिताच्या आड येत आहे. त्यासाठी हे कायदे बदलने गरजेचे आहे.

हिंदुचे धर्मांतर हा अजेंटा

काही धर्मांध मुसलमान व ख्रिस्ती या देशामध्ये राहुन हिंदुना येणे केण प्रकारे खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतरासाठी भाग पाडत आहेत. त्यामुळे आपली संस्कृती टिकली पाहिजे त्यासाठी ही मंदिरे वाचली पाहिजेत त्यासाठी संघटीत व्हा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जय श्रीराम च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

आपल्या धर्माचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे- आ. संग्राम जगपात

या धर्मसभेत बोलताना अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या धर्माचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमुद करत एकसंघ होण्याचे आवाहन केले. आपल्या पुर्वजानी मोगली आक्रमकांना जशास तसे उतर देत आपला हिंदू धर्म व हिंदुत्व टिकवले आहे. आता आपली जबाबदारी आहे, त्यासाठी एकसंघ रहाणे गरजेचे आहे. जाचक कायदे बदलण्याची गरज आहे. आज बहुसंख्य असलेले हिंदू अल्संख्यांक होऊ लागले आहेत, आणि अल्पसंख्याक असलेले मुस्लीम बहुसंख्य होऊ लागले आहेत. त्यामुळे आता आपण अधिक जागरून झाले पाहिजे, धर्माभिमानी झाले पाहिजे. प्रकारे राजापुरात नाही तर राज्यात आणि देशातही हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण केले जाते, मात्र त्याला जशास तसे उत्तर आपण दिले पाहिजे, राजापुरातील हा सुर्यमंदिराचा लढा अधिक तीव्र करूया आंम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आपल्या हक्कासाठी लढावे लागते हे दुदैव- सागर उर्फ भैय्या बेग

छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी लढून ३६० किल्ले ताब्यात घेतले होते, त्या छत्रपतींच्या राज्यात आंम्ही रहातो आणि आता आंम्हाला आमच्या हक्कासाठी, मंदिरासाठी लढावे लागते, सभा मोर्चे काढावे लागतात आहे यासारखे दुदैव नाही. त्यामुळे आता आपणच आपला लढा अधिक तीव्र केला पाहिजे, अनेक मंदिरे मुस्लीमांनी आपल्या ताब्यात घेतली मात्र हिदू शांत राहिले, मात्र आता शांत बसायचे नाही., कारण आता हा भारत देश बदलला आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आंम्ही वाट्टेल ते करू असे नमुद करत हिंदूना भ्रष्ट करण्याचे कारस्थान पुर्वीपासूनच सुरू आहे, मात्र आता त्याला बळी पडायचे नाही, आतली शक्ती दाखवून द्यायची असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी सकल हिंदू समाजाच्या वतीने स्वामी नरेंद्र महाराज यांसह मान्यवरांचा दादा राजापकर, महेश मयेकर, मोहन घुमे, संदिप मालपेकर, विवेक गादीकर, राजेंद्र कुशे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन एड. सुशांत पवार यांनी केले. या धर्मसभेला मोठया संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.