पाण्याचे पाईप काढण्यास नगरपंचायतीचा नकार, देवगड पेट्रोल पंपा नजीकचे गटार रखडले

निधी अभावी देवगड जामसंडे नगरपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढण्यास नकार दिल्याने देवगड पेट्रोल पंप नजीक होणाऱ्या गटाराचे बांधकाम थांबवावे लागणार आहे याबाबत समन्वयाने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांची आहे

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने देवगड येथील पेट्रोल पंपाजवळ गटाराचे बांधकाम करायला सुरुवात झाली होती यामध्ये नगरसेविका तनवी चांदोस्कर यांनी पुढाकार घेतला होता मात्र या ठिकाणी देवगड जामसंडे नगरपंचायतीतील जनतेला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन अस्तित्वात आहे ही पाईपलाईन काढल्याशिवाय गटार करणे कठीण आहे

नगरपंचायतीने पत्र देऊन 25 लाख रुपये खर्च असल्याने आपण पाईपलाईन बाजूला करू शकत नाही असे उत्तर दिले आहे

देवगड पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन या ठिकाणी ट्राफिक जाम होते या ठिकाणी तातडीने गटार काढणे गरजेचे आहे हि बाब लक्षात घेऊन आमदार नितेश राणे यांनी याबाबत मंजुरी मिळवली होती

मात्र देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या भूमिकेमुळे यामध्ये आता अडचणी येत आहेत याबाबत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने समन्वय साधून हे काम सुरू होईल का सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत असे देवगड जामसंडे मधील नागरिकांची मागणी आहे