कातवन येथे गोवा दारू पकडली

देवगड / प्रतिनिधी

कातवण येथील ‘जांभळीचे टेंब’ एसटी स्टॉपनजीक अवैध गोवा बनावटीची दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी दिनेश केशव जोईल (वय ४३, रा. कातवण वरचीवाडी) या संशयिताविरुद्ध महाराष्ट्र अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई २३ ऑगस्ट रोजी दुपारी ४.१५ वा. च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने केली आहे. या कारवाईत संशयिताकडून सुमारे ११ हजार ३०० रू. चा अवैध गोवा बनावटी दारुचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिनेश जोईल याच्याकडून अवैध गोवा बनावटीच्या ४८०० रू. किंमतीचे बॉब्स् लेमन होडकाच्या १८० मि. ली. च्या सीलबंद एकूण ४८ प्लास्टिकच्या बाटल्या, २५०० रू. किंमतीच्या बॉब्स् लेमन होडकाच्या १८० मि. ली. च्या सीलबंद एकूण २५ प्लास्टिकच्या बाटल्या, २ हजार रू. किंमतीच्या हेवर्डस् फाईन व्हिस्कीच्या १८० मि. ली. मापाच्या सीलबंद एकूण २० प्लास्टिकच्या बाटल्या, १६०० रू. किंमतीच्या डीएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्कीच्या १८० मि. ली. च्या सीलबंद एकूण ८ काचेच्या बाटल्या, ४०० रू. किंमतीच्या नॅशनल डॉक्टर ब्रॅण्डच्या १८० मि. ली. च्या एकूण ४ प्लास्टिकच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गचे पोलीस हवालदार किरण कृष्णा देसाई यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.