केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी येथे शालोपयोगी वस्तूंचे वाटप

वायंगणी सुरंगपाणी : “आपण समाजाचे काही देणे लागतो” या उदात्त भावनेतून श्री. दिगंबर नारायण धोंड यांनी केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी तसेच अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या, चित्रकला वह्या, खाऊ तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षक, अंगणवाडी सेविका,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थितांनी श्री. दिगंबर धोंड यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारे पुढे यावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.