रत्नागिरीत आजपासून “माऊली मनामनातली” पंढरीच्या वारीचे छायाचित्र प्रदर्शन

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : पाच वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर ह्या वर्षी-सुद्धा उद्यापासून म्हणजेच आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर लेन्स आर्ट, रत्नागिरी, विठ्ठल रखुमाई मंदिर मित्रमंडळ आणि विठ्ठल मंदिर देवस्थानच्या सौजन्याने घेऊन येत आहोत “माऊली मनामनातली” …

ह्या वर्षी झालेल्या पंढरीच्या वारीचे छायाचित्र प्रदर्शन विठ्ठल मंदिर येथील धर्मशाळेत भरविण्यात येणार आहे. वारीमध्ये सहभागी झालेल्या भाविक वारकऱ्यांच्या मानामधील दडलेल्या माऊलीचा वेध घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे आम्ही काही हौशी युवा छायाचित्रकारा आणि आमच्यातीलच काही व्यावसायिक छायाचित्रकार मित्रांनी केला आहे.

यावर्षी झालेल्या खुडूस फाटा येथील रिंगणाचे छायाचित्रिकारण आणि वारीदरम्यान काढलेले वारकऱ्यांचे भावचित्रण खूप वेगळ्याप्रकारे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या प्रयत्नाला अपणासर्व रत्नागिरीकरांकडून भरभरून प्रोत्साहन मिळावे आणि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आम्ही लेन्स आर्ट ग्रुप करतो.

यावर्षी भरपूर रत्नागिरीकर वारीला जाऊन आले, त्यातीलच काही मित्रमंडळी आणि छायाचित्रकरांनी काढलेल्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन असणार आहे. उद्याचा आषाढी एकादशीचा दिवस असल्याने प्रति पंढरपूर म्हणून पूजल्या जाणाऱ्या आपल्या रत्नागिरीतल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये हे प्रदर्शन सर्व भाविकांन पाहता येईल.

सहभागी छायाचित्रकार :
अनिकेत दुर्गावली
साईप्रसाद पिळणकर
परेश राजीवले
शुभेश मोरे
सिद्धांत शिंदे
अमित आंबवकर
प्रशांत निंबारे
शिरीष तारवे
सुमेध तारवे
साईराज माचकर
ओंकार कोळेकर
वीरेंद्र डफळे
तन्मय दाते
शिवम शिंदे
सिद्धेश मोरे
संतोष शिवगण