नरडवे धरण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज व हक्काचे भूखंड वाटप
लाभार्थ्यांना आर्थिक पॅकेज व हक्काचे भूखंड वाटप
कणकवली – नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज तसेच हक्काचे भूखंड यांचे वाटप करण्यात करण्याची संधी मला मिळाली. हे आर्थिक पॅकेज व भूखंड हे तुमच्या हक्काचे आहे. या प्रकल्पाला गती देण्याचे काम माझे राहील, असा विश्वास मस्त व्यवसाय व बंदरे विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी दिला. नरडवे येथे नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेज व भूखंड वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. पुढे नाम. नितेश राणे म्हणाले, आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. प्रकल्पग्रस्तांना हक्काचे भूखंड मिळत असून हा क्षण सर्वांच्या सहकार्यामुळे साध्य झाला आहे. यापुढे या प्रकल्पाला गती देणे ही माझी जबाबदारी असेल. या प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन पालकमंत्री खासदार नारायण राणे यांच्या काळात झाली होती. या प्रकल्पासाठी ज्यांनी आपली जमीन दिली आहे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही आमची जबाबदारी आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, अधीक्षक अभियंता प्रभाकर पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शीतल जाधव, कार्यकारी अभियंता विनायक जाधव, तहसीलदार दीक्षांत देशपांडे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांची प्रमुख उपस्थित होते.












