देवगड : महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा उद्या, दि. २५ एप्रिल (शनिवार) रोजी देवगड दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उद्या सायंकाळी ५ वाजता देवगड येथील भाजप कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते देवगडमधील पवनचक्की गार्डनला भेट देणार आहेत. रात्री ८ वाजता देवगडमध्ये आयोजित नाट्यमहोत्सवालाही ते उपस्थित राहणार आहेत.
दि. २६ एप्रिल (रविवार) रोजी सकाळी ९ वाजता ‘कॉफी विथ युथ’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता ते कुणकेश्वर मंदिर येथे जाऊन दर्शन घेणार आहेत. पुढे सोयीप्रमाणे तेथून कणकवलीकडे प्रयाण करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे.
दरम्यान, ‘कॉफी विथ युथ’ या कार्यक्रमाला सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम यांनी केले आहे.











