कोकणवासीयांच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली
मंडणगड | प्रतिनिधी – भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या निमीत्ताने मंडणगड तालुक्यात 3257 गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात मंडणगड पोलीस स्थानकाचे हद्दीत 2945 घरगूती व 10 सार्वजनीक तर बाणकोट पोलीस स्थानकाचे हद्दीत 300 घरगूती व 2 सार्वजनीक गणेश मुर्तीचा समावेश आहे. तालुक्यातील गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मुंबईतील कोकणवासीय (26) रोजी मोठ्या प्रमाणावर तालुक्यात दाखल झाले असून यामुळे शहरात वाहनांची मोठी वर्दळ वाढलेली दिसून आली. गणेशोत्सवाकरिता लागणाऱ्या विविध वस्तुंनी शहराची बाजारपेठ भरुन गेली असून दुकानांमध्ये खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतेही मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. गणेशोत्सवाचे कालावधीत कोणतीही अनुचीत घटना घडू नये याकरिता मंडणगड पोलीस स्थानक व बाणकोट सागरी पोलीस स्थानक यांच्यावतीने गावागामध्ये सभा घेऊन शांततेत उत्सव साजरा कऱण्याचे आवाहन करण्यात आले आहे याचबरोब चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.











